पिंपरी : पिंपरीतील विकासकामांची सतत चर्चा, शरद पवारांकडून अजित पवारांचं कौतुक
Continues below advertisement
अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड भागात केलेल्या विकासाची दबक्या आवाजात चर्चा सुरू असते, असं म्हणत शरद पवार यांनी अजित पवारांचं कौतुक केलं आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व सृजन पब्लिकेशन यांच्या वतीने आयोजित पिंपरी चिंचवड अचिव्हर्स या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा व गौरव कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी शून्यातून आपलं विश्व निर्माण करणाऱ्या पिंपरी चिंचवडमधील उद्योजकांना पवारांच्या हस्ते सत्कार देऊन गौरवण्यात आले.
Continues below advertisement