पिंपरी चिंचवड : मागण्या पूर्ण होईपर्यंत धरणातून पाणी सोडणार नाही : पवना धरणग्रस्त
पवनेच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हं आहेत. मुलांना नोकरी द्या, जमिनीचा मोबदला द्या आणि प्रलंबित पुनर्वसन पूर्ण करा. त्याशिवाय पवना धरणातून एक थेंबही सोडणार नसल्याचा पवित्रा धरणग्रस्तांनी घेतला आहे. पिंपरी चिंचवड शहर आणि मावळ तालुक्यातील अनेक गावांची तहान पवना धरणाच्या पाण्याने भागवली जाते. मात्र आता पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांनी आता धरणातून पाणी सोडणार नसल्याची भूमिका घेतली आहे.