पिंपरी-चिंचवड : आळंदीत चिमुकल्याने गिळलेला सेल पोटातच फुटला
चिमुकल्याने रिमोटचे बटन सेल गिळल्याची आणि तो पोटात फुटल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा घडली आहे. हुजैफ तांबोळी असं या मुलाचं नाव असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आळंदी येथे तांबोळी कुटुंबीय राहतं. आज सकाळी कुटुंबीयांच्या आधी हुजैफ झोपेतून जागा झाला. खेळता खेळता टेबलवर ठेवलेला रिमोट त्याने घेतला. तो काही वेळा आपटला. त्यातून बटन सेल बाहेर आला. त्या आवाजाने सगळे जागे झाले, पण तोपर्यंत हुजैफने सेल गिळले होते. ही बाब लक्षात येताच रुग्णालयात धाव घेण्यात आली. दुर्बिणीच्या साहाय्याने शस्त्रक्रिया करुन सेल बाहेर काढण्यात आला.