पिंपरी चिंचवड : भाजपचा फरार नगरसेवक अखेर पोलिसांना शरण
Continues below advertisement
बनावट कागदपत्र सादर करण्याचा ठपका असणारा पिंपरी चिंचवडचा भाजप नगरसेवक अखेर पोलिसांना शरण आला आहे. तुषार कामठे असं या नगरसेवकाचं नाव आहे.
काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठेंनी 27 ऑक्टोबरला सांगवी पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासूनच कामठेचा मोबाईल नॉट रिचेबल होता. अखेर पोलिसांच्या अटकेच्या भितीने कामठेने पोलिसांना शरण येणं पसंत केलं.
Continues below advertisement