पिंपरी : धारदार शस्त्राने पिंपरीत सराईत गुन्हेगाराची हत्या
Continues below advertisement
पिंपरीमध्ये एका सराईत गुन्हेगाराची धारधार शस्त्रानं हल्ला करून हत्या करण्यात आली आहे.
आकाश लांडगे असं या हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नावं आहे.
काल रात्री चिंचवड पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जागी ही घटना घडली.
रणजित चव्हाणच्या टोळीनं आकाश लांडगेची हत्या केल्याची माहिती मिळतेय. आकाश आणि रणजितच्या गटात झालेल्या वादात काही महिन्यांपूर्वी शहरात वाहनांची तोडफोडही करण्यात आली होती.
हत्या झालेला आकाश लांडगे हा विकी घोलप टोळीचा मेंबर होता. आकाश भाजीपाल्याचा व्यवसाय करायचा. विकी घोलप आणि रणजित चव्हाणच्य़ा टोळीच्या भांडणात आकाशचा बळी गेल्याचं बोललं जातंय.