फिलिपाईन्स : अनधिकृतपणे आयत झालेल्या कोट्यवधींच्या आलिशान गाड्यांवर बुलडोझर
देशात अनधिकृतपणे आयात झालेल्या आलिशान आणि महागड्या गाड्यांवर बुलडोझर फिरवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. डेलीमेल यूके या वेबसाईटनुसार यावेळी तब्बल 68 गाड्यांवर बुलडोझर फिरवण्यात आला. या कारवाईमुळे फिलीपाईन्सचे राष्ट्रपती रॉड्रिगो ड्युएर्ते हे देशातल्या भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. 2016 च्या निवडणुकीच्या प्रचारातच राष्ट्रपतींचं भ्रष्टाचार आणि ड्रग्जविरोधात कारवाईचा अजेंडा होता. त्यामुळे राष्ट्रपतींच्या आणि सरकारच्या या कारवाईमुळे स्थानिकांकडून सरकारची वाहवा तर होत आहे.