मुंबई : राज्यात पेट्रोल-डिझेलचे दर लवकरच उतरणार : सुधीर मुनगंटीवार

Continues below advertisement
जोरदार टीका झाल्यानंतर केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकानं देखील पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्रात पेट्रोल 2 तर डिझेल 1 रुपयांनी स्वस्त होणार असल्याची माहिती मिळतेय. तसं ट्विटचं राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी केलंय. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राज्यांना इंधनाचे दर कमी कऱण्याच्या सूचना दिल्या होत्या.. त्यानंतर राज्य सरकारनं हा निर्णय घेतल्याच कळतंय. दरम्यान पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यानंतर सर्वसामान्य जनतेनं रोष व्यक्त केला होता..तसंच सर्वपक्षीयांनी आंदोलनं केली होती.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram