मुंबई : जिग्नेशच्या सभेला बंदी, मग संघाच्या हिंदू चेतना संगमला का नाही? अर्जून डांगळेंचा सवाल

Continues below advertisement
पुण्यातल्या जिग्नेश मेवाणीच्या सभेला जर परवानगी नाकारली जात असेल, तर संघाच्या हिंदू चेतना संगमाला कशी परवानगी मिळाली? असा सवाल रिपब्लिकन नेते अर्जुन डांगळे यांनी केला आहे.
ठाणे आणि गोव्यात आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदू चेतना संगमाचे आयोजन करण्यात आले आहे. पोलिसांनी कोरेगाव-भीमा हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या जिग्नेश मेवाणीच्या सभेला बंदी घातली होती... त्यामुळे आता तोच निकष संघाच्या कार्यक्रमांना लावला जावा अशी मागणी अर्जुन डांगळे यांनी केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram