सांगोला : आमदार गणपतराव देशमुख यांच्या फोनमुळे पेनूर गावाला मिळाला बस थांबा
Continues below advertisement
सांगोला मतदारसंघाचे शेकाप आमदार गणपतराव देशमुख यांच्या एका फोनमुळे एका विद्यार्थीनीच्या गावाला बस थांबा मिळाला आणि असंख्य विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. गणपतराव देशमुख यांना पेनूर गावच्या प्रेरणा गवळी या मुलीने पत्र लिहून मोहोळला कॉलेजला जाण्यासाठी गावात बस थांबत नसल्याच्या आशयाचं पत्र लिहिलं होतं. केवळ एकच बस याठिकाणी थांबते, शिवाय गर्दी पाहाता एक बस पुरेशी नाही, त्यामुळे सकाळी 7 ते 8.15 च्या दरम्यान दुसऱ्या बसला थांबा करण्याची विनंती तिने पत्रामार्फत केली, या पत्राची दखल घेत आमदार देशमुखांनी पंढरपूर आगारप्रमुखांना फोन करुन पंढरपूर-सोलापूर बसला पेनूरला थांबा देण्याचा सुचना केल्या आणि त्यानुसार आता पेनूरला बस थांबणार आहे अशा आशयाचं पत्र देशमुखांनी स्वतः प्रेरणाला लिहिलं.
Continues below advertisement