पाटणा: लालूप्रसाद यादव दोषी, तेजस्वी यादव यांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना आणखी एका चारा घोटाळ्याचा प्रकरणात दोषी ठरविण्यात आलंय.
याप्रकरणी लालूंना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय.
चाईबासा कोषागार घोटाळ्याप्रकरणी रांची येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवलं. चारा घोटाळ्यातील हे तिसरं प्रकरण आहे. याप्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांनाही 5 वर्षांची शिक्षा सुनावलीय. चाईबासा घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने ५६ आरोपींपैकी ५० जणांना दोषी तर सहा जणांना निर्दोष ठरवण्यात आलं. चाईबासा कोषागारप्रकरणी १२ डिसेंबर २००१ मध्ये ७६ जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं.