Ajit Pawar Resign | अजित पवार राजकारण सोडणार नाहीत : पार्थ पवार | ABP Majha

Continues below advertisement

गेल्या 15 तासांपासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार नॉट रिचेबल आहेत. काल
अजित पवार यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर रात्री उशीरा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुंबईतील निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. ही बैठक रात्री अकरा ते साडे बाराच्या दरम्यान पार पडली. बैठकीत अजित पवारांनी तडकाफडकी राजीनामा का दिला? याबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित नव्हते. काल ते पुण्यातून मुंबईला रवाना झाले. पण मुंबईतल्या वरळीतल्या निवासस्थानी पोहोचले नाहीत. ते थोड्याच वेळात सिल्व्हर ओकला पोहोचतील अशी माहिती आहे.
तर अजित पवार कुठे आहेत. याचाही ठाव ठिकाणा लागला नाही.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram