अहमदनगर : पारनेरमध्ये वाळू तस्करांकडून तहसीलदारांना जाळण्याचा प्रयत्न
Continues below advertisement
अहमदनगरमधल्या पारनेरमध्ये वाळू तस्करांविरोधात कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदारांना वाळू तस्करांनी जाळण्याचा प्रयत्न केला. तसंच पथकावर दगडफेक करून पकडलेली वाहने वाळू तस्करांनी पळवून नेली आहे. कोहकडी गावात काल दुपारी हा धक्कादायक प्रकार घडला. तहसीलदार भारती सागरे पथकासह कुकडी नदीतील वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी नदीपात्रात दोन वाळूने भरलेले ट्रॅक्टर आणि एक पोकलेन पकडला.
Continues below advertisement