बीड : माझ्या टेबलवर फाईल असती, तर कधीच मराठा आरक्षण दिलं असतं : पंकजा मुंडे
Continues below advertisement
"माझ्या टेबलवर मराठा आरक्षणाची फाईल असती, तर क्षणाचाही विलंब न करता आरक्षण दिले असते. पण हे प्रकरण कोर्टात असल्याने विलंब होत आहे," असं राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या. तसेच, ती फाईल ना माझ्या टेबलवर आहे, ना मुख्यमंत्र्यांच्या, हे प्रकरण कोर्टात असल्यामुळे विलंब होत आहे, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.
पंकजा मुंडे यांनी आज बीडमधील परळीत ठिय्या आंदोलन करणाऱ्या मराठा मोर्चेकऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.
पंकजा मुंडे म्हणाल्या, “तुमचा आक्रोश ऐकण्यासाठी आले आहे. मी तुम्हाला वाकायला सांगणार नाही. मी तुमची दूत बनणार आहे. तुमच्यासाठी मी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांपर्यंत जाणार आहे.