बीड : कोट्यवधींचा गैरव्यवहार करुन दिलीप आपेट फरार, आमरण उपोषणाचा ठेवीदारांचा इशारा

Continues below advertisement
परळीसह उस्मानाबाद आणि भूम तालुक्यातल्या अनेकांना कोट्यवधी रुपयांना चूना लाऊन पळून गेलेल्या दिलीप आपेटला अटक करावी या मागणीसाठी आता ठेवीदार आक्रमक झाले आहेत.
आपेटविरुद्ध पोलिस प्रशासनासह, मंत्री पंकजा मुंडे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना वारंवार निवेदन देऊनही काहीही झालेलं नाही. यामुळं या ठेवीदारांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याचा इशारा दिला आहे.
आपेटनं शुभकल्याण नावानं मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटी सुरु केली.आणि १८ टक्के दरानं व्याज देण्याचं आमिष दाखवून कोट्यवधी रुपये जमा केले. मात्र नोटबंदीनंतर आपेट फरार झाला. या ठेवीदारांनी वर्षभरापासून पोलीस प्रशासनापासून मंत्र्यांपर्यंत सगळ्यांचेच उंबरे झिजवले. मात्र यांना न्याय मिळाला नाही. अखेर या ठेवीदारांनी आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram