KEM Hospital | केईएम रुग्णालयात संतप्त नातेवाईकांचा गोंधळ | मुंबई | ABP Majha
Continues below advertisement
रविवारी शिवडीतील जकरीया बंदर परिसरात झालेल्या भीषण अपघात झाला होता. या घटनेत एकुण 6 जण जखमी झाले होते तर उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर आज मुंबईतल्या केईएम रुग्णालयात अपघातातील रुग्णांच्या नातेवाईकांनी गोंधळ घातला आहे.
या अपघातातील जखमींवर व्यवस्थित उपचार होत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तसेच आरोपींना पकडण्यात यश न आल्याने जखमींच्या नातेवाईकांचा गोंधळ घातला आहे. जवळपास दीडशेहून अधिक लोकांनी मिळून रुग्णालयात गोंधळ घातला आहे. या सर्व प्रकारामुळे केईएम रुग्णालयाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जवळपास 150-200 च्या जमावाने रुग्णालयाच्या आत शिरत जोरदार घोषणाबाजी सुरु केली. तर घोषणाबाजीमुळे वातावरण तणावपूर्ण बनलंय आहे. या सर्व प्रकारामुळे केईएम बाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.