परभणी : पाथरीमध्ये सुमारे आठ लाखांचा गुटखा जप्त

Continues below advertisement
परभणी जिल्ह्यातील पाथरीमध्ये अन्न आणि औषध प्रशासनानं टाकलेल्या धाडीत सुमारे आठ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. याप्रकरणी तीन व्यापाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पाथरीमध्येही मोठ्या प्रमाणावर गुटख्याची विक्री केली जात असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाला मिळाली होती. याच माहितीच्या आधारे शहारातील तीन व्यापाऱ्यांवर धाडी टाकण्यात आल्या असता त्यांच्याकडे गुटखा आढळला. दरम्यान, बंदी असतानाही गुटख्याची विक्री कशी होते असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram