Diwakar Raote | परिवहन मंत्री दिवाकर रावतेंचा निषेध करत रिक्षाचलकांची घोषणाबाजी | परभणी | ABP Majha

Continues below advertisement
परभणीतल्या रिक्षा चालकांनी परिवहन विभागाविरोधात संप पुकारलाय. काही दिवसांपूर्वी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या ताफ्याला आडवं गेल्याचा आरोप काही रिक्षाचालकांवर करण्यात आला होता..त्यानंतर आरटीओनं रिक्षाचालकांवर कारवाई केली होती. अनेक रिक्षा पकडण्यात आल्या...मात्र दंड वसूल करण्याऐवजी त्या रिक्षा एसटीच्या विभागीय कार्यशाळेत लावण्यात आल्या होत्या...त्याविरोधात आता रिक्षाचालक आक्रमक झाले असून त्यांनी संप पुकारलाय..रिक्षाचालक संघटनांनी दिवाकर रावतेंचा निषेध करत मोर्चा काढला आणि जोरदार घोषणाबाजीही केली..रिक्षाचालकांच्या या संपामुळे सामान्य प्रवाशांना मात्र मोठ्या त्रासाला समोरं जावं लागलं...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram