परभणी : जवानाची पत्नी 22 दिवसांपासून एक वर्षाच्या मुलीसह बेपत्ता
Continues below advertisement
चीनच्या सीमेनजिक देशाचं संरक्षण करण्यासाठी तैनात एका जवानाची पत्नी 22 दिवसांपासून एक वर्षाच्या मुलीसह गायब आहे. तिचं नक्षलवाद्यांनी अपहरण केलं असावं किंवा मानवी तस्करीची ती बळी पडली असावी, असा नातलगांना संशय आहे.
उगवत्या सुर्याच्या प्रदेशात, अरूणाचलात मराठी जवानाच्या बाबतीत ही घटना घडली. दुर्दैव असं की देशभक्तीचे मोठ मोठी भाषण देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून देशाच्या संरक्षण मंत्र्यांपर्यंत एकानेही या जवानाची फिर्याद ऐकली नाही. 22 दिवस हिमालयाच्या दऱ्या खोऱ्यात आपल्या आठ वर्षाच्या मुलाला पाठीवर घेऊन या जवानाने बायकोचा शोध घेतला. पण यश मिळालं नाही. या घटनेची माहिती मिळताच एबीपी माझाने पाठपुरावा सुरु केला.
Continues below advertisement