परभणी : जिंतूरमध्ये शिवजयंतीनिमित्त जिजाऊ ब्रिगेडकडून मशाल फेरीचं आयोजन
शिवजयंती निमित्त परभणीतल्या जिंतूर शहरात महिलांनी मशाल फेरी काढली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 388 व्या जयंतीनिमित्त या मशाल फेरीत 388 महिलांनी सहभाग घेतला. जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं ही फेरी काढण्यात आली. जिंतूरच्या सिद्धेश्वर मंदिरातून जिजाऊंना वंदन करुन नंतर नर्सिंह चौकातल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळच्या नियोजीत जागेवर या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.