Diwakar Raote | परिवहन मंत्री दिवाकर रावतेंच्या ताफ्याला आडवे गेले म्हणून परभणीत 500 रिक्षाचालकांवर कारवाई | ABP Majha
Continues below advertisement
परिवहन मंत्री दिवाकर रावतेंच्या ताफ्याला अडचण निर्माण झाली म्हणून परभणीत जवळपास 400 ते 500 रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आलीय. दोन दिवसांपासून सर्व रिक्षा एसटीच्या विभागीय कार्यशाळेत ठेवल्या आहेत. पोलिसांकडून कारवाईची योग्य माहितीही दिली जात नसल्याचा आरोप रिक्षाचालकांनी केलाय.
14 ऑगस्टला परीवहनमंत्री दिवाकर रावते परभणीच्या दौऱ्यावर होते. यादरम्यान त्यांच्या ताफ्याला रिक्षांचा अडथळा निर्माण झाला. त्यानंतर त्यांनी दिलेल्य़ा आदेशाने शहरातल्या जवळपास 400 ते 500 रिक्षांवर कारवाई करण्यात आलीय.