परळ, मुंबई : प्लॅस्टिक हँडग्लोव्ह्ज घालून पाणीपुरी विकणाऱ्यांवर पालिकेची कारवाई
Continues below advertisement
राज्यात प्लॅस्टिकबंदी लागू झाल्यानंतर मुंबई पालिका अधिकाऱ्यांनी आता कडक कारवाईला सुरुवात केली आहे. परळच्या हाय स्ट्रीट फिनिक्स मॉलमध्ये हँडग्लोव्हज घालून पाणीपुरी विकली म्हणून तृप्ती स्वीटसच्या दुकानदाराला 5000 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कोणताही पदार्थ खायला देताना हँडग्लोव्हज घालूनच देण्यासाठी ग्राहक आग्रही असतात असं या दुकानदारानं म्हटलं आहे. याला कुठलाही पर्यायी मार्ग नसल्याचंही त्याचं म्हणणं आहे. पावसाळ्यात नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य विभागाकडून नेहमीच दिला जातो. पाणीपुरी विक्रेत्यांना मात्र यासाठी पर्यायी मार्ग वापरावा लागणार आहे.
Continues below advertisement