मुंबई : मॅक डॉनल्डमध्ये प्लास्टिक स्ट्रॉऐवजी कागदी स्ट्रॉचा वापर
गेल्या आठवड्यात प्लाल्टिक वस्तूंच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय सरकार तर्फे घेण्यात आला आणि पेय पिण्याच्या स्ट्रॉवरही या नियमानुसार बंदी घालण्यात आली. जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या मॅक डॉनल्ड या कंपनीनं याबाबत एक कौतुकास्पद पाऊल उचललं आहे. मॅक डी ने आपल्या शीतपेयांसोबत पेपर स्ट्रॉचा नवा पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध करुन दिला आहे.