Sharmila Thackeray | नवी मुंबईत शर्मिला ठाकरे यांच्या गाडीला अपघात | ABP Majha

Continues below advertisement
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या गाडीला पनवेलजवळ अपघात झाला. एकवीरा देवीच्या दर्शनावरुन परतत असताना ही दुर्घटना घडली. अपघातात शर्मिला ठाकरे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. राज ठाकरे दुसऱ्या गाडीत होते. अपघात झाला त्यावेळी त्यांचा ताफा पुढे निघून गेला होता. विधानसभा निवडणुकीच्या आधी मनसेप्रमुख राज ठाकरे आज (5 ऑक्टोबर) सकाळी सहकुटुंब कुलदैवत एकवीरा देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शनावरुन परत येत असताना दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात झाला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram