स्पेशल रिपोर्ट : सलमान खानकडून मानसिक छळ, पनवेलमधील NRI शेजाऱ्यांचा आरोप

Continues below advertisement
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांनी आपला मानसिक छळ केल्याचा आरोप एका एनआरआय दाम्पत्याने केला आहे. पनवेलमधील खान कुटुंबाच्या फार्महाऊस शेजारी तक्रारदार कक्कड दाम्पत्याच्या मालकीची जमीन आहे. अनिता आणि केतन कक्कड यांनी 1996 मध्ये पनवेलमध्ये जमीन विकत घेतली होती. ही जमीन सलमान खानच्या फार्महाऊसच्या शेजारी आहे. जमिन खरेदीनंतर 18 वर्ष कक्कड दाम्पत्य अमेरिकेत राहत होतं. मात्र 2014 मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांची पनवेलमधील जमिनीवर बंगला बांधण्याची इच्छा होती. आपण अमेरिकेत असताना खान कुटुंबाला काहीही हरकत नव्हती, मात्र भारतात परतल्यानंतर त्यांच्याकडून त्रास दिला जात असल्याचा दावा कक्कड यांनी केला आहे. सलमान खानच्या लोगोचं गेट लावून आपल्याला प्लॉटवर जाऊ दिलं जात नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram