पनवेल : महापालिकेचं 516 कोटींचं बजेट सादर
Continues below advertisement
पनवेल महापालिकेचं पहिल्या सार्वत्रिक निवडणूकीनंतरच पहिलं बजेट आयुक्त सुधाकर शिंदे यांनी सादर केलं. ५१६ कोटींचं हे बजेट आहे. अनेक समस्यांनी ग्रस्त असलेल्या पनवेल शहराचा कायापालट होण्यासाठी या बजेटमध्ये विशेष तरतुदी करण्यात आल्यायेत. महापालिकेच्या स्थापनेनंतर जो ग्रामीण भाग महापालिकेत समाविष्ट झाला होता त्या भागातील पायाभुत सुविधांवर विशेष भर देण्यात आलाय. त्यासाठी अर्थसंकल्पात १२५ कोटींची तरतूद करण्यात आलीये. तसच रस्ते आणि फुटपाथच्या दुरुस्तीनंतर सिडकोकडून हस्तांतरण करुन घेण्यात येणार आहे.
Continues below advertisement