पनवेल: कामोठेत व्यावसायिक कारणातून गोळी झाडून हत्या
नवी मुंबईच्या कामोठे परिसरात व्यावसायिक शांताराम कुटाळ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीय. कुटाळ यांचा दुधे चौकात गाड्यांच्या बॅटरी विकण्याचा व्यवसाय आहे. काल रात्री दहा वाजता ते दुकान बंद करुन जात असताना चौकातच त्यांची हत्या करण्यात आली. आरोपीने कुटाळ यांना पहिल्यांदा चाकुने भोसकले आणि त्यानंतर त्यांच्यावर जवळून दोन गोळ्या झाडल्या. व्यावसायिक कारणावरुन हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय.