पनवेल : कळंबोळीत चोरट्यांचा धुमाकूळ, रात्रीत आठ दुकानं फोडली
Continues below advertisement
कळंबोलीत चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातलाय. एकाच रात्रीत तब्बल ८ दुकानं चोरट्यांनी फोडले आहेत. यात किराणा, बूट, बॅग आणि कपडे या दुकानांसह एक पतपेढीही चोरट्यांनी फोडली आहे. रात्री २ ते पहाटे ४ पर्यंत अवघ्या दोन तासात चोरट्यांनी ही करामत केलीय. कळंबोलीत वाढत असलेलं गुन्हेगारीचं प्रमाण आणि त्यात एकाच रात्रीत चोरट्यांनी ८ दुकानं फोडल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तसंच पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही या घटनेनं प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.
Continues below advertisement