पनवेल : पनवेल पालिका-सिडकोच्या वादात शहरात कचऱ्याचं साम्राज्य
Continues below advertisement
औरंबादेतील कचराकोंडीचा प्रश्न कायम असताना आता पनवेलमध्ये कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनलाय. खारघर, कामोठे, कळंबोली आणि नवीन पनवेल मधील कचरा मागील 4 ते 5 दिवसांपासून सिडकोने उचलणे बंद केलंय. या कचराकोंडीला कारणीभूत ठरलाय पनवेल महापालिका आणि सिडको प्रशासनाचा वाद. जोपर्यंत कचरा महापालिका स्वतःकडे हस्तांतरण करून घेत नाही तोपर्यंत सिडकोने कचरा उचलावा असे आदेश शासनाचे आहेत. परंतु या आदेशाला केराची टोपली दाखवत सिडकोने काही दिवसांपासून कचरा उचलणे बंद केलंय. पनवेल पालिकेकडे पुरेसे सफाई कर्मचारी नसल्याने कचरा हस्तांतरण करणार नसल्याची भूमिकाआयुक्त सुधाकर शिंदेंनी घेतली आहे. त्यामुळे सिडको आणि महापालिकेच्या वादात सर्वसामान्य नागरितांना नाहक त्रास सहन करावा लागतोय.
Continues below advertisement