ब्रेकफास्ट न्यूज : पनवेल : आरपीएफ जवानाने वाचवले प्रवाशाचे प्राण

Continues below advertisement
पनवेल रेल्वे स्थानकात आरपीएफच्या जवानानं प्रसंगावधान राखत एका प्रवाशाचे प्राण वाचवले आहेत. हा प्रवासी चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता. परंतु ट्रेनमध्ये चढताना त्याचा पाय घसरला. याचवेळी प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेले आरपीएफचे जवान विनोद शिंदे यांनी धाव घेत त्या प्रवाशाला धावत्या ट्रेनपासून बाजूला ओढलं. जर काही क्षणाचा जरी उशीर झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता. १४ जुलैची ही घटना आहे. हा प्रवासी नांदेड-पनवेल ही एक्स्प्रेस गाडी पकडण्याचा प्रयत्न करत होता
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram