लातूर : पंकजांचा मानलेला भाऊ रमेश कराड धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत
Continues below advertisement
विधानपरिषद निवडणुकीपूर्वी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या अकरा वर्षांपासून मुंडे गटाचे खंदे समर्थक असलेले, पंकजा मुंडे यांचे मानलेले भाऊ रमेश कराड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश करण्यात आला. कराड यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळणार आहे.
Continues below advertisement