हरियाणा : पानिपतमध्ये मराठ्यांच्या शौर्याचा स्मरण दिन उत्साहात साजरा
Continues below advertisement
पानिपतावर रविवारी दरवर्षीप्रमाणे मराठा शौर्य दिवस साजरा करण्यात आला. १४ जानेवारी १७६१ ला पानिपतच्या तिसऱ्या युद्धात अहमदशाह अब्दालीसारख्या परकीयांचं आक्रमण रोखण्यासाठी मराठ्यांनी जीवाची बाजी लावली होती. त्या युद्धातल्या वीरांना स्मरुन हा दिवस साजरा होतो. या कार्यक्रमासाठी नागपूरच्या भोसल्यांचे वंशज मुधोजीराजे भोसले, जिजाऊंच्या घराण्याचे वंशज बाबाराजे जाधव, इतिहासकार वसंतराव मोरे हेही आवर्जून उपस्थित होते.
Continues below advertisement