पंढरपूर : आषाढी यात्रेपूर्वी विठ्ठल दर्शनासाठी टोकन पद्धत, मंदिर समितीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
Continues below advertisement
येत्या आषाढी यात्रेपूर्वी पंढरपुरातील वारकऱ्यांना रांगेशिवाय थेट विठ्ठलाचं दर्शन घेता येणार आहे. मंदिर समितीनं त्रिलोक सिक्युरिटी सिस्टीम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी करार करून ही व्यवस्था त्यांच्याकडे सोपवली आहे. आज झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पंढरपूर शहरातील 30 महत्वाच्या ठिकाणी हे दर्शन पास वितरित केले जाणार आहेत. भाविकांना टोकनवर दर्शनाची वेळ देण्यात येणार आहे. त्यामुळे त्या वेळेत तुम्ही मंदिरात गेलात की तुम्हाला तातडीनं दर्शन मिळू शकेल. गर्दीच्यावेळी दर मिनिटाला 40 ते 45 आणि इतर वेळी दर मिनिटाला 35 ते 40 या प्रमाणे देवाच्या दर्शनाला अवधी लागत असतो. त्याचा विचार करून भाविकांना हे टोकन मोफत दिले जाणार आहेत.
Continues below advertisement