Pandharpur | पंढरपुरात आता दोन विठ्ठल, बडव्यांनी उभारलेल्या मंदिरात विठूरायाची मूर्ती स्थापन | ABP Majha
पंढरपुरात बडव्यांनी उभारलेल्या विठ्ठल मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. विठ्ठल मंदिराचे अधिकार हातून गेल्यानंतर बाबासाहेब बडवे यांनी नवं विठ्ठल मंदिर उभारलंय. काही दिवसांपूर्वी उत्पात समाजाच्या वतीनं रुक्मिणी मंदिर उभारून त्यात रुक्मिणीमातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली होती. त्यानंतर आता बडव्यांनीही आपल्या समाजातील मंडळीना उपासना करता यावी यासाठी बाबासाहेब बडवेंनी आई वडिलांच्या स्मरणार्थ नवं विठ्ठल मंदिर उभं केलंय.