पंढरपूर : विठुरायाच्या मूर्तीची झीज रोखण्यासाठी पुन्हा वज्रलेप
पंढरपूरच्या विठुरायाच्या मूर्तीची झीज रोखण्यासाठी मूर्तीवर पुन्हा रासायनिक प्रक्रिया करण्यात येणार आहे. मंदिर समितीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. विठुरायाच्या मूर्ती संवर्धनासाठी रासायनिक लेपन करण्यात येणार आहे. मंदिर समितीने पुरातत्व विभागाशी यासंदर्भात संपर्क केला आहे.