पंढरपूर : कोपर्डीतील आरोपींना 3 महिन्यात शिक्षा द्या, नाहीतर जनआंदोलन उभारु : सुप्रिया सुळे

Continues below advertisement

कोपर्डी खटल्यातील आरोपींना 3 महिन्यात फाशी न झाल्यास पंढरपूर ते मुंबई जनआंदोलन करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. पंढरपुरात युवा संवाद यात्रेसाठी सुप्रिया सुळे आल्या असता त्या पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. सरपंचापासून ते राष्ट्रपतींपर्यंत सगळी सत्ता भाजपकडे असूनही नागरिकांचे कोणतेच प्रश्न सुटत नसल्याची टीका सुप्रिया सुळेंनी केली. इतर पक्षातून भाजपमध्ये गेलेले खासदार अपेक्षित कामगिरी दाखवू शकत नसल्यानं पंतप्रधान 70 टक्के नवीन चेहऱ्याना संधी देणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं. दरम्यान, आमच्याकडून काही चुका झाल्याची प्रांजळ कबुलीही सुप्रिया सुळेंनी यावेळी दिली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram