पंढरपूर : वसंतोत्सवानिमित्त विठुरायावर सप्तरंगाची उधळण
Continues below advertisement
ज्याच्या भक्तीचे, महिमेचे विविध रंग पाहायला मिळतात, त्या विठुरायाला आज रंगवलं गेलं. कारण होतं वंसतोत्सवाचं. वसंत पौर्णिमेपासून रंगपंचमीपर्यंत रोज विठुरायाला पांढरा पोशाख परिधान केला जातो आणि त्यावर विविध प्रकारचे नैसर्गिक रंग उडवून त्या रंगात श्रीरंगाला रंगविले जातं. आज रंगपंचमीला हजारो भक्त देवाच्या अंगावर रंग उडविण्यासाठी आणि त्याचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. पहाटेपासूनच पंढरपूरात रंगपंचमीच्या जल्लोषाला सुरुवात झाली. आज संध्याकाळी देवाची पूजा करुन देवाच्या रंगांचा डफ प्रदक्षिणा मार्गावरून फिरविण्यात येतो आणि त्यातला रंग आपल्या अंगावर पडावा यासाठी शेकडो भाविक या डफात सामील होतात.
Continues below advertisement