पंढरपूर : 2019 ला 52 टक्के अलुतेदार-बलुतेदारांना विधानसभेत पाठवणार : प्रकाश आंबेडकर

Continues below advertisement
२०१९ च्या निवडणुकीत राज्यातून ५२ टक्के अलुतेदार-बलुतेदारांना महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवण्याचा निर्धार भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. पंढरपूरात आयोजित धनगर समाजाच्या सत्ता संपादन निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपसह सर्वच पक्षांवर टीकेची झोड उठवली. गेल्या विधानसभा निवडणुकीत धनगर आरक्षणाचा मुद्दा कळीचा ठरला होता. मात्र भाजप सरकारकडून आरक्षणाच्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यानं धनगर समाज नाराज आहे. त्यामुळे ५२ टक्के लोकसंख्या असलेल्या आलुतेदार आणि बलुतेदारांनी विधानसभेत ५२ टक्के जागा मिळवून सत्ता काबीज करा असं आवाहनही त्यांनी केलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram