पंढरपूर : विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव
विठुरायाच्या नगरीमधील बाटली आडवी करण्यासाठी आता पुन्हा वारकरी संप्रदायाने जोरदार तयारी केली आहे. मंदिर समितीच्या आज झालेल्या बैठकीत शहरातील मांस तसंच मद्य विक्रीवर बंदी घालण्याचा ठराव करण्यात आला.
पंढरपूर ही महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी असून इथे मांस आणि मद्य विक्री बंद करावी, या मागणीसाठी वारकरी संप्रदाय गेली अनेक वर्षे मागणी करत आहे. फडणवीस सरकारने नव्याने केलेल्या मंदिर समिती पुनर्रचनेत वारकरी संप्रदायाला मोठे स्थान मिळाले. त्यानंतर वारकरी संघटनांनी आज पुन्हा मंदिर समिती बैठकीपूर्वी आपल्या मागण्याची निवेदनं मंदिर समिती अध्यक्ष अतुल भोसले आणि सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांना दिली होती.