मुंबई : वारी निर्विघ्नपणे पार पडायला हवी, उदयनराजेंचं आवाहन

Continues below advertisement

मुंबई : टाळ-मृदंग आणि विठ्ठल नामाने पंढरपूर दुमदुमू लागलंय. आषाढीनिमित्त संध्याकाळपर्यंत पालख्या आणि दिंड्या पंढरीत दाखल होणार आहेत. मात्र या भक्तीरसाने गरजणाऱ्या पंढरपुरात मराठा मोर्चाही सुरु आहे. मात्र आषाढी यात्रा सुरळीतपणे पार पडू द्यावी, असं आवाहन उदयनराजे भोसले यांनी आंदोलकांना केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून पंढरपुरासह अनेक शहरांमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन पुकारण्यात आलं आहे. पंढरपुरात दरवर्षी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी शासकीय पूजा होऊ देणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram