पंढरपूर : कार्तिकी एकादशीनिमित्त महसूलमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा
Continues below advertisement
कार्तिकी एकादशीनिमित्त आज सुमारे सहा लाख भाविकांनी विठूरायाच्या पंढरीत हजेरी लावली. राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पहाटे सपत्नीक शासकीय महापूजा संपन्न झाली.
यावेळी कर्नाटकातील विजापूर येथील बळीराम चव्हाण आणि शिनाबाई चव्हाण या दाम्पत्याला मानाच्या वारकऱ्यांचा मान मिळाला.
कर्नाटक परिवहन विभागात कंडक्टर असलेल्या चव्हाण यांनी महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा असं साकडं विठूरायाला घातलं.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील जनता सुखी आणि सुरक्षित राहू दे, असं साकडं विठूरायाला घातलं.
Continues below advertisement