पंढरपूरच्या विकासासाठी कॅनडाकडून 2 हजार कोटींचा निधी
Continues below advertisement
कॅनडा सरकार पंढऱपूरच्या विकासासाठी दोन हजार कोटी रुपये देणार असल्याच्या बातमीनंतर वारकरी आणि लोकांमध्ये बऱ्याच उलट-सुलट चर्चा झाल्या आहेत. कॅनडानं दिलेल्या पैशांची परतफेड कोण करणार, तिरुपतीसारखी देवस्थानं सोडून कॅनडानं पंढऱपूरचीच निवड का केली, इतक्या मोठ्या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी न करता पंढरपूर मंदिरांच्या अध्यक्षांनी कशी केली, असे अनेक प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडले आहेत.
Continues below advertisement