पंढरपूर : कर्जबाजारी वडिलांवरील वाढत्या शैक्षणिक खर्चामुळे मुलीची आत्महत्या
Continues below advertisement
कर्जबाजारी वडिलांवर शिक्षणाच्या वाढलेल्या खर्चाचा भार नको म्हणून 17 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार गावात घडली. डिप्लोमाचं शिक्षण घेत असलेल्या अनिशा लवटे हीने हे टोकाचं पाऊल उचललं.
शिक्षणाचा वाढता खर्च शेतकऱ्यांना न झेपणारा झाला आहे. याच वाढत्या दडपणाखाली येऊन अनिशा लावतेने जीवन संपवलं. पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार या गावात हनुमंत लवटे यांचं कुटुंब एक एकर शेतीवर आपली उपजिविका भागवतं.
सलग दोन वर्षांचा दुष्काळ आणि त्यानंतर झालेली गारपीट यामुळे त्यांच्या एक एकर शेतीतील द्राक्षाची बाग जाळून गेली. यामुळे घरावरील कर्ज वाढत चाललं होतं. शेतीच्या अशा बेभरवशी व्यवसायामुळे लवटे यांनी आपल्या तीनही मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रित केलं होतं. त्यांची मोठी मुलगी सांगोल्यातील एका इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे, तर दुसरी अनिशा तासगाव येथे डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती.