पंढरपूर : पंढरपुरात तब्बल १२३ इमारती धोकादायक, नगरपरिषदेची माहिती
पंढरपुरात तब्बल १२३ इमारती या धोकादायक अवस्थेत असल्याचं समोर आलं आहे. आषाढीच्या निमित्तानं पंढरपूर नगरपरिषदेनं शहरातल्या इमारतींचं सर्व्हेक्षण केलं. त्यात ही बाब उघड झाली आहे. त्यामुळे आषाढीसाठी पंढरपुरात येणाऱ्या भक्तांनी या धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्य करु नये, असं आवाहन नगरपरिषदेनं केलं आहे. धोकादायक इमारतींमध्ये श्रीमंत होळकर सरकार यांच्या ऐतिहासिक वाड्याचाही समावेश आहे. येत्या आठ दिवसात या इमारती घरमालकानी स्वतः पाडायच्या सूचना नगरपरिषदेने मालकांना दिल्या आहेत. इमारती न पाडल्यास नगरपरिषद तात्काळ कारवाई करेल, असंही नोटीसमध्ये म्हटलं आहे.