पंढरपूर : तब्बल 123 इमारती धोकादायक अवस्थेत

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने केलेल्या धोकादायक इमारती सर्वेक्षणात शहरातील 123 इमारती या धोकादायक आढळल्या असून यात श्रीमंत होळकर सरकार यांच्या ऐतिहासिक वाड्याचाही समावेश आहे. आषाढी यात्रेत आलेला पारंपरिक वारकरी हा नेहमीच मंदिर परिसर , प्रदक्षिणा मार्ग भागात यात्रा काळात निवासी रहात असतो . हि घरे देखिल वर्षानुवर्षे ठरलेली असुन त्याच ठिकाणी हि वारकरी कुटुंबे उतरत असतात. मंदिराजवळ रहायला मिळावे हा या मागचा मुख्य हेतु असला तरी यातुन स्वस्त दरात राहण्याची सोय होत असल्याने अशा ठिकाणी राहणे वारकरी पसंत करतात. मात्र यातील अनेक इमारती धोकादायक बनल्याने यात्राकाळात दुर्घटना झाल्यास गंभीर प्रसंगाला सामोरे जावे लागते. यामुळेच नगरपालिकेने शहरातील अशा 123 धोकादायक इमारतींवर नोटीसा लावल्या असून यात निवास न करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे .

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola