नागपूर : बिल्डरच्या पत्नीची आत्महत्या, मानसिक छळ केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा
Continues below advertisement
नागपुरात बिल्डरच्या पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी सहा मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पल्लवी नागुलवार यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी सहा फॅमिली फ्रेण्ड्सविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नागपुरातील बांधकाम व्यावसायिक राहुल नागुलवार यांच्या पत्नी पल्लवी यांनी 9 मार्च रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुसाइड नोटमध्ये त्यांनी सहा कौटुंबिक मित्रांनी मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप केला होता.
तपासानंतर पोलिसांनी अविनाश घुसे, संजय महाकाळकर, राकेश तिडके, संजय गिलहुरकर, पंकज पवार आणि एकावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. संजय महाकाळकर हे काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक आहेत.