पालघर : अयोध्येत राम मंदिर बनवण्याचं आम्ही ठरवलंय, ते तसं बनलंच पाहिजे : मोहन भागवत
विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं पालघरमध्ये विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आलं. या संमेलनाला सरसंघचालक मोहन भागवत यांची प्रमुख उपस्थिती होती. हिंदूंनी सर्व मतभेद विसरुन एकत्रित येण्याचं आवाहन यावेळी भागवत यांनी केलं. तसंच आम्ही कोणाच्या विरोधात नसून अयोध्येत राममंदीर बांधणार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. या संमेलनाला स्वामी सरचिदानंद महाराज तसेच बालयोगी सदानंद बाबा महाराज उपस्थित होते.