पालघर : दाट धुक्यामुळे डहाणूहून विरार, पनवेलकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या उशिरा

Continues below advertisement
गेल्या ४ दिवसांपासून उन्हाचा कडाका सहन करणाऱ्या पालघरकरांना आज सकाळी अचानक गारवा अनुभवायला मिळाला. इथं डहाणू ते वैतरणा दरम्यान दाट धुक्याची चादर पसरली होती. यामुळं सकाळी डहाणूहून विरार, बोरीवली, अंधेरी आणि पनवेलच्या दिशेनं जाणाऱ्या लोकल अर्धा ते एक तास उशीरानं धावत होत्या. जसं दिवस पुढं गेला, तसं धुकंही कमी झालं. मात्र आज सकाळच्या अनुभवामुळं इथल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. सध्या पालघरसह डहाणूच्या तापमानातही घट झाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram