पालघर : दगडखाणीतल्या पाण्यात बुडून दोघींचा मृत्यू
पालघरमध्ये दगडखाणीत बुडून महिला आणि तिच्या 9 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झालाय... तर 17 वर्षीय तरूणीची प्रकृती गंभीर आहे.... साधना पटेल त्यांची मुलगी श्रद्धी किणी आणि शुभांगी नारले या तिघी फरले पाड्यात नातेवाईकांकडे आल्या होत्या.. दगड खाणीत कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या.. मात्र चिमुकली श्रद्धाचा पाय घसरला आणि ती पाण्यात पडली.. तिला वाचवण्यासाठी महिलेनं पाण्यात उडी घेतली.. मात्र दोघींचा बुडून मृत्यू झाला..