पालघर : मनसेपाठोपाठ शिवसेनाही बुलेट ट्रेनविरोधात मैदानात
मनसेपाठोपाठ आता शिवसेनेनंही पालघरमधल्या बुलेट ट्रेनविरोधी कृती समितीला पाठिंबा दिला आहे. आज दुपारी १२ वाजता कृती समितीचं शिष्टमंडळ मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे. स्थानिक लोकांचा जमीन अधिग्रहणाला विरोध असेल तर शिवसेना त्यांच्या पाठिशी उभी राहिल असं सेनेच्या गोटातून सांगण्यात येतंय. पालघरची पोटनिवडणुक तोंडावर आल्यानं सेनेकडून ही भूमिका घेण्यात आल्याचं बोललं जातंय. याआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही बुलेट ट्रेनची कामं पाडली होती