पालघर: क्रिकेटपटू शार्दुल ठाकूरचे आई-वडील अपघातात जखमी

भारताचा मध्यमगती गोलंदाज शार्दुल ठाकूरच्या आई-वडिलांना अपघात झाला आहे. पालघरमध्ये बाईक घसरुन झालेल्या अपघातात दोघं जण जखमी झाले आहेत.

ठाकूर कुटुंबीय पालघरमधील माहिम गावचे रहिवासी आहेत. शार्दुलच्या आई हंसा ठाकूर आणि वडील नरेंद्र ठाकूर पालघर अल्याळीमध्ये एका लग्न समारंभाला गेले होते. लग्नानंतर माहिमच्या दिशेने येताना त्यांना अपघात झाला.

बाईक घसरुन पडल्यामुळे ठाकूर दाम्पत्य जखमी झालं. दोघांना पालघरमधील ढवळे रुग्णालयात प्राथमिक उपचारांसाठी नेण्यात आलं. त्यानंतर वडिलांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात हलवण्यात आलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola